तबलिगीचे मौलाना साद, चौकशीसाठी पोलिसांना भेटण्यास तयार?

टीम ई-सकाळ
Friday, 10 April 2020

मोलाना साद यांच्या मुलाने दिल्ली गुन्हे अन्वेषण विभाग आधिकाऱ्यांची गुरुवारी याबाबत भेटही घेतली असल्याचे समजते.

नवी दिल्ली Coronavirus : ताबलिगी जमातचे प्रमुख मौला्ना मोहम्मद साद यांनी जमातच्या मुख्यालयात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशी आधिकाऱ्यांना भेटण्याची तयारी दाखवल्याचे वृत्त आहे. या वेळी आपल्यासोबत गुन्हा दाखल केलेले अन्यही असतील असेही सांगितल्याचे समजते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

माध्यमांना सामोरे जाण्यास आपण तयार नाही. मात्र, ताबलिगी जमातच्या निझामुद्दीन येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाची चौकशी करणाऱ्या आधिकाऱ्यांना भेटण्यास तयार आहोत, असे त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मोलाना साद यांच्या मुलाने दिल्ली गुन्हे अन्वेषण विभाग आधिकाऱ्यांची गुरुवारी याबाबत भेटही घेतली असल्याचे समजते. मौलाना साद यांनी झाकीर नगरमधील घरात स्वतःचे विलगीकरण केले आहे. ते नेमके कुठे आहेत, याबाबत केवळ मोहम्मद युसुफ आणि मोहम्मद सय्यद या त्यांच्या मुलांसह काही नातेवाईकांनाच माहिती असल्याचा दावा करण्यात आला. मौलाना साद पोलिसांपासून लपलेले नाहीत. ते गुन्हे अन्वेषण विभाग आधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच तर, त्यांचा मुलगा आधिकाऱ्यांना भेटला असेही सूत्रांनी सांगितले. सर्व कागदपत्रे तसेच सर्व व्यक्ती गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधिकाऱ्यांना एकाच जागी भेटू शकतील यासाठीच मुख्यालय सूचवले आहे. आवश्यकता असेल, त्यावेळी मोलाना साद तसेच अन्य आरोपींना चौकशीस बोलावण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितल्याचा दावा काहींनी केला. मौलाना साद यांच्यासह सहआरोपी असलेल्यांची पत्ते पोलिसांकडे आहेत. यासंदर्भातील फोरन्सिक अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा आहे. जमातच्या मुख्यालयातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. पण, त्यात लॅपटॉप नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आणखी वाचा - पुण्यात मार्केट यार्डचा एक विभाग बंद होणार!

आणखी वाचा - अमिताभ गुप्तांवरची कारवाई थातूर मातूर?

वादग्रस्त संदेश
मौलाना साद यांनी लॉकडाऊनचे नियम न पाळण्याविषयी सोशल मीडियावरून संदेश दिला होता. तो व्हायरलही झाला. पण, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मौलाना साद नरमले आणि त्यांनी तबलिगींनी डॉक्टरांना साथ द्यावी, उपचार घ्यावेत, असा संदेश दिला. सध्या मोलाना साद फरार असले तरी, त्यांनी ताबलिगी जमातच्या मुख्यालयात भेटण्याची तयारी दर्शवल्यामुळं ते मुख्यलय परिसरात कोठे तरी असल्याचं बोललं जातंय. आता ते मुख्यालयात कधी येणार? पोलिस त्यांची चौकशी कधी करणार? त्यांना अटक होणार का? या विषयी उत्सुकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus tablighi jamaat maulana saad ready for meeting with delhi police