coronavirus: कोरोनाच्या उपचाराचा खर्च किती?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची आकडेवारी सध्यातरी कमी आहे. योग्य वेळी उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.

कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची आकडेवारी सध्यातरी कमी आहे. योग्य वेळी उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. परंतु, त्याचा उपचार स्वस्त नाही. चला, जाणून घेऊया की कोरोनावर उपचारासाठी किती खर्च येऊ शकतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासगीमध्ये उपचार खर्च
कोरोनाचा थैमान जगभरात वेगाने पसरत आहे. त्यात खासगी असो वा सरकारी रुग्णालये, सर्वजण कोरोना लागण झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी दिवसरात्र एकत्रितपणे लढा देत आहेत. सरकारी रुग्णालये कोरोना रूग्ण आणि संशयितांनी पूर्णपणे भरले आहे, म्हणून खासगी रुग्णालयात याचा होणारा खर्च समजून घेणे फार महत्वाचे आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे. पण, उपचारांवरील खर्च, त्या त्या शहरांनुसार तेथील आरोग्य सुविधांनुसार राज्य सरकारच्या नियोजनानुसार बदलणारे आहेत. 

कोरोना रुग्णांच्या पूर्णपणे बरे होण्याचा साधारण खर्च
कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी सरकारकडून खासगी रुग्णालयांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये खर्चाची कोणतीही सक्ती नव्हती. अर्थातच, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील होणारा खर्च खूप जास्त असेल.  जनरल वॉर्डमध्ये उपचार घेतल्यास त्याची किंमत ११ हजार रुपये असू शकते तर, आयसीयूसाठी ती ५० हजार रुपये असू शकते. सरकारी रुग्णालयांपेक्षा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जास्त महाग आहेत. त्याच वेळी, जनरल वार्डचे आयसोलेशन वार्डमध्ये रूपांतर केल्यामुळे याचा खर्च वाढला आहे. तसेच पीपीई किट्सची किंमतही यात जोडली गेली आहे.

हा खर्च कसा वाढतो?
कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी सुमारे १५  दिवस लागतात. अशा परिस्थितीत उपचाराची किंमत एक-एक दिवसाने वाढत जाते आणि हा खर्च ७,५०,००० रुपयांपर्यंत जातो. जनरल वॉर्ड बद्दल बोलायचे झाल्यास हा खर्च १,६५,००० रुपयांपर्यंत जातो, आणि यात व्हेंटिलेटरचा खर्च जोडला गेला तर, खर्च आणखीच वाढेल, असं नवभारत टाईम्सच्या वृत्तात म्हटलंय. मुळात रुग्णावर उपचारांसाठी किती खर्च येणार यापेक्षा हा रोगच आपल्याला होऊ नये म्हणून, आपण काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

अर्थव्यवस्थेवरील परिणाम
कोरोना विषाणूवर उपचार करणे इतके महाग आहे की तो खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही, त्याची सर्व बचत एकाच झटक्यात पूर्णपणे जाऊ शकते.  कोरोनामुळे अर्थव्यवस्था आधीच डगमगत चालली आहे. अशा परिस्थितीत सरकारने जनतेसाठी सामाजिक सुरक्षेची व्यवस्था करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus treatment expenses india information marathi