esakal | उपासमार होत असलेल्यांना उत्तर प्रदेशात दिलासा! 
sakal

बोलून बातमी शोधा

yogi-adityanath

कोरोना संसर्गाच्या प्रसारामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारने आर्थिक दिलासा देण्यासाठी आज सुमारे ४ लाख ८१ हजार ७५५ जणांच्या खात्यांवर प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले. यात फेरीवाले, रिक्षा चालवणाऱ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांची नावे शहर विकास विभागाकडून निश्‍चित करण्यात आली.

उपासमार होत असलेल्यांना उत्तर प्रदेशात दिलासा! 

sakal_logo
By
पीटीआय

लखनौ - कोरोना संसर्गाच्या प्रसारामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारने आर्थिक दिलासा देण्यासाठी आज सुमारे ४ लाख ८१ हजार ७५५ जणांच्या खात्यांवर प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले. यात फेरीवाले, रिक्षा चालवणाऱ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांची नावे शहर विकास विभागाकडून निश्‍चित करण्यात आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संसर्गाच्या पाश्‌र्वभूमीवर २१ दिवसाचा लॉकडाउन असून त्याची २१ मार्चपासून अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाउनमुळे बाजारपेठ, दैनंदिन व्यवहार आणि वाहतूक बंद असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राहते निवासस्थान पाच कालिदास मार्ग येथून ४८ कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध जिल्ह्यातील कॉन्फरन्सिंगने संवाद साधला.

उत्तर प्रदेश सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, लॉकडाउनच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार गरीब, मजुरांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. ज्यांचे नाव रेशनकार्डवर नाही किंवा ज्यांना रेशन कार्ड नाही, अशा लोकांना देखील धान्य पुरवठा केला जाणार आहे. राज्यात मोलमजुरी करणारे, रिक्षा चालक, इ-रिक्षा चालक, भाजी मंडईत काम करणारे मजुर, गरीबांच्या रोजदारींवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात गरजूंना बेरोजगार भत्ता आणि अन्नधान्य पुरवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.