Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus: What is Quarantine?

कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी जगभरात थैमान घातलेले असताना संपूर्ण जग एकप्रकारे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी आपल्या कानावर नेहमी क्वारंटाईन हा शब्द पडत असेल. क्वारंटाईन होणं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्नदेखिल आपल्या मनात आला असेल. तर क्वारंटाईन म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं.

Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?

पुणे : कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी जगभरात थैमान घातलेले असताना संपूर्ण जग एकप्रकारे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी आपल्या कानावर नेहमी क्वारंटाईन हा शब्द पडत असेल. क्वारंटाईन होणं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्नदेखिल आपल्या मनात आला असेल. तर क्वारंटाईन म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं. क्वारंटाईला 'आयसोलेशन' असंही म्हटलं जातं. क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी सध्या अनेकांना क्वारंटाईन केलं जात आहे. त्यात होम क्वारंटाईन ही संज्ञा जन्माला आली आहे. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे, त्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला वैद्यकिय तज्ञांकडून दिला जात आहे.

क्वारंटाईन का केले जाते?
खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स 6 फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे. प्रत्येकालाच क्वारंटाईन व्हा असं डॉक्टर्स सांगत नाहीत. पण एखाद्याला त्रास होत असल्यास तो व्यक्ती घरच्याघरीही काळजी घेवू शकतो. कुटुंबीयांपासून सहा फूट अंतर ठेवावं. घरी वावरतानाही तोंडावर रुमाल बांधावा. आपलं साहित्य वेगळं ठेवावं. क्वारंटाईन केल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते. संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी स्वतःला क्वारंटाईन करून घेणे हा चांगला पर्याय आहे.

loading image
go to top