राष्ट्रपती भवनात कोरोना पोचला; परिसरातील १२५ कुटुंबाचे विलगीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 22 April 2020

कोरोना संसर्गाने आता सर्वांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या राष्ट्रपती भवनातही दबक्या पावलांनी प्रवेश केला.एवढेच नव्हे तर लोकसभा सचिवालयाच्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाने आता सर्वांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या राष्ट्रपती भवनातही दबक्या पावलांनी प्रवेश केला. एवढेच नव्हे तर लोकसभा सचिवालयाच्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रपतींच्या दारातही कोरोनाने आता पाऊल ठेवले आहे. राष्ट्रपती भवन परिसरात काम करणाऱ्या एका महिलेत कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या महिलेची सासू कोरोनाग्रस्त होती. त्यानंतर या परिसरातील जवळपास १२५ कुटुंबांना विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाचे कामकाज कालपासून सुरू झाले. यापैकी वरील कार्यरत एका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. संसदेच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक गाडीला ते कर्मचाऱ्यांनाही हात स्वच्छ करूनच प्रवेश दिला जातो. मात्र या कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याबरोबर त्याच दालनात अनेक कर्मचारी काम करतात. कॉफी बोर्ड आणि टी बोर्डवर नेहमीच वर्दळ असते. तेथेही हा कर्मचारी गेला असण्याची आणि त्याच्या संपर्कात अनेक लोक आले असण्याची शक्यता आहे. या सर्वांमध्ये आता घबराट उडाली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुख्य इमारतीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कुटुंब राहते, तिथे कोरोनाचा कुठलाही धोका पोहचलेला नाही. शेकडो एकरांमध्ये विस्तारलेली राष्ट्रपती भवनाची मालमत्ता (प्रेसिडेन्शियल इस्टेट) व या संपूर्ण परिसराची देखभाल करणारे शेकडो कर्मचारी या परिसरातच राहतात. त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या आईला व नंतर पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून या परिसरातल्या १२५ कुटुंबांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid-19 case at rashtrapati bhavan