केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दिल्लीतील मुख्यालय सील 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 May 2020

सीआरपीएफच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या वाहनचालकाला कोरोना संक्रमण झाल्याचे आढळल्यानंतर दोन दिवसांसाठी मुख्यालय सील करण्यात आले. पुढील आदेशापर्यंत कोणालाही मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या उपद्रवामुळे आता केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दिल्लीतील मुख्यालय देखील सील करावे लागले आहे. मुख्यालयात काम करणारा एका कर्मचारी आणि एक बस चालक संक्रमित झाल्याचे चाचणीतून आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीआरपीएफच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या वाहनचालकाला कोरोना संक्रमण झाल्याचे आढळल्यानंतर दोन दिवसांसाठी मुख्यालय सील करण्यात आले. पुढील आदेशापर्यंत कोणालाही मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच इमारतीचे निर्जंतुकीकरण देखील सुरू झाले आहे. आधीच सीआरपीएफच्या एका पलटणीचे कोरोनाच्या संसर्गाच्या संशयामुळे विलगीकरण करावे लागले आहे. 

दिल्लीच्या मयूरविहार भागात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या 31 व्या पलटणीतील 22 जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर 100 जवानांच्या चाचणीचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मागील आठवड्यात याच पलटणीतील 45 जवान संक्रमित निघाले होते. तर 28 एप्रिलला एका उपनिरीक्षकाचे निधन झाले होते. संबंधित उपनिरीक्षकाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यामुळे संपूर्ण तुकडीचे विलगीकरण करण्याचा निर्णय सीआरपीएफ प्रशासनाने घेतला असून, उर्वरित सर्व जवानांचीही चाचणी घेतली जात आहे. 

काश्मीरच्या कुपवाडा भागात तैनात असताना 162व्या पलटणीच्या वैद्यकीय साहाय्यकांच्या संपर्कात आल्यामुळे सीआरपीएफच्या पलटणीला संसर्ग झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CRPF headquarters in Delhi sealed