दिल्ली हादरली; 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

टीम ई-सकाळ
Sunday, 12 April 2020

शहर आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. पण, भूकंपाचे हादरे संपल्यानंतर पुन्हा नागरिक घरांमध्ये गेले. 

नवी दिल्ली Coronavirus : दिल्ली सह उत्तर भारतातील काही शहरांना आज भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची क्षमता 3.5 इतकी होती. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळं लॉकडाऊन अतिशय कडक पाळण्यात येत आहे. परंतु, भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली शहर परिसरातील नागरिक रस्त्यांवर उतरले. लॉकडाऊन आणि त्यातच भूकंपाचा धक्का यामुळं शहर आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. पण, भूकंपाचे हादरे संपल्यानंतर पुन्हा नागरिक घरांमध्ये गेले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेच्या जिऑलॉजीकल सर्वे नुसार भूकंपाचा केंद्र बिंदू नेपाळमध्ये होता. नेपाळच्या खापटाड नॅशनल पार्कमध्ये जमिनीच्या खाली केवळ 1.3 किलोमीटवरर या भूकंपाचा केंद्र बिंदू होता. अमेरिकेच्या सर्वेनुसार त्याची क्षमता 5 होती. या केंद्रबिंदूमुळं दिल्ली सह संपूर्ण उत्तर भारत हादरला आहे. या भूकंपामुळं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु, भारतात लॉकडाऊनची स्थिती असताना भूकंप जाणवल्याने नागरिक मोठ्याप्रमाणावर घरातून बाहेर आले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याने तेथे झालेल्या 2015च्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या भूकंपात नेपाळमध्ये जवळपास 10 हजार जणांचा बळी गेला होता. 

या ठिकाणी जाणवले हादरे

  • दिल्ली 
  • उत्तराखंड 
  • उत्तर प्रदेश
  • बिहार
  • नेपाळ सीमा 
  • संपूर्ण नेपाळ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi uttar pradesh border 3.5 Richter scale earthquake lock down