केंद्रीय श्रममंत्रालयाचे नियंत्रण कक्ष स्थापन

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 13 April 2020

लॉकडाउनचेनिमित्त करून कामगारांचे वेतन नाकारण्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने राज्यनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. देशभरातील १९ नियंत्रण कक्षांपैकी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे हे कक्ष असतील.

नवी दिल्ली - लॉकडाउनचेनिमित्त करून कामगारांचे वेतन नाकारण्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने राज्यनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. देशभरातील १९ नियंत्रण कक्षांपैकी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे हे कक्ष असतील. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासंदर्भात ‘सकाळ’ने रविवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली. वेतन न मिळाल्याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित मालक कंपन्या, संस्थांविरुद्ध कारवाईचे अधिकार या नियंत्रण कक्षांना देण्यात आले आहेत. हे नियंत्रण कक्ष दहा एप्रिलपासून सुरू झाले असून १ मेपर्यंत कार्यरत असतील. अहमदाबाद, आसनसोल, कोलकाता, नागपूर, पाटणा आदी शहरांमध्ये हे नियंत्रण कक्ष आहेत.

महाराष्ट्रातील नियंत्रण कक्षाचे ईमेल, मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे....

  • करमचंद, केंद्रीय उपमुख्य श्रमआयुक्त, मुंबई ( ईमेल dyclc.mum-mh@nic.in, मोबाईल - ८७९०१७२४८८ व्हॉट्सअॅप – ८७९०१७२४८८)
  • बी. एस. राठोड, केंद्रीय निवासी श्रमआयुक्त (ईमेल dyclc.mum-mh@nic.in, मोबाईल ७७१८०४६७७९, व्हॉट्सअॅप ७७१८०४६७७९)
  • जे. एन. एस. चौधरी केंद्रीय निवासी श्रम आयुक्त, पुणे  (ईमेल – rlc.pune-mh@nic.in, मोबाइल ९८११७१६०३१ व्हाॅट्सअॅप ९८११७१६०३१)
  • डॉ. माधवन, केंद्रीय निवासी श्रमआयुक्त (ईमेल commr-rlc-mh@nic.in, मोबाईल - ९४४५४८६९७५ व्हॉट्सअॅप – ९४४५४८६९७५)
  • कल्पना सिसोदिया, सहाय्यक श्रमआयुक्त (ईमेल – dyclc.mum-mh@nic.in, मोबाईल - ९१६६९८८९९९ व्हॉट्सअॅप – ९१६६९८८९९९)
  • नागपूर : टी. के. सिंह, निवासी श्रमआयुक्त (ईमेल – dyclc.ngr-mh@nic.in / rlcngp-mh@nic.in, मोबाईल - ९५७५५४५११८ व्हाॅट्सअॅप ९५७५५४५११८)
  • सचिन शेलार, सहाय्यक श्रमआयुक्त (ईमेल – alcngp-mh@nic.in, मोबाईल ९९६७२६००८८, व्हॉट्सअॅप -९९६७२६००८८)
  • एस. आर. शिंदे, सहाय्यक श्रमआयुक्त (ईमेल - alc-chpngr-mh@nic.in, मोबाईल - ९४२२१६३३४५ व्हॉट्सअॅप – ९४२२१६३३४५)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Control Room of the Union Ministry of Labor