Coronavirus : कुटुंब अन्‌ आपलीही काळजी घ्या!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

हे करू नका

  • सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर थुंकू नका.
  • ताप व खोकला यांसारखी लक्षणे असताना, इतरांशी निकटचा संपर्क टाळा.
  • कत्तलखाने व उघड्यावर मांस असणाऱ्या ठिकाणी जाऊ नका.
  • चांगल्या पद्धतीने शिजवलेले अन्न खा.

आपले हात वारंवार स्वच्छ धुवा 
नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुतल्याने आपल्या हातावर असलेले विषाणू नष्ट होतात.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निकटचा संपर्क टाळा 
जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते, तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडातून लहान द्रव थेंबावाटे फेकले जातात, ज्यात विषाणू असू शकतो. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या खूप जवळ असाल, तर तुमच्या शरीरातही ते प्रवेश करण्याची शक्‍यता असते. त्यामुळे खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवा.

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका
आपल्या हातांद्वारे बऱ्याचशा वस्तू, फर्निचर, हॅंडल्स आदी ठिकाणी स्पर्श केला जातो, ज्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्‍यता असते. आपल्या हातावाटे विषाणू डोळे, नाक किंवा तोंडात शिरकाव करतात. त्यानंतर आपल्या शरीरात प्रवेश करून आपण आजारी पडू शकतो.

चांगल्या गोष्टींची सवय लावा 
आपणासह सभोवतालच्या लोकांनी श्‍वसनासंबंधी आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात. जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा आपले तोंड किंवा नाक आपल्या हाताच्या कोपराने किंवा टिश्‍यू पेपरने झाकावे. वापरलेल्या टिश्‍यू पेपरची त्वरित विल्हेवाट लावा.कारण लहान-लहान थेंबांद्वारे विषाणू पसरतात. म्हणून काळजी घेतल्यास सर्दी, फ्लू आणि कोविड-१९ यांसारख्या विषाणूंपासून बचाव करता येतो.

वैद्यकीय सेवा लवकर घ्या 
जर आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी राहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, तर वैद्यकीय मदत घ्या व पूर्वसूचना म्हणून डॉक्‍टरांना संपर्क करा. या काळात आपल्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करा.कारण आपल्या भागातील परिस्थितीविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे अद्ययावत माहिती असते. पूर्वसूचना म्हणून संपर्क केल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात योग्य आरोग्य सुविधा मिळवून देता येईल. यामुळे आपले संरक्षणही होईल आणि जीवघेणे विषाणू व इतर संसर्गाचा फैलाव रोखण्यास मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family and care for you too by Coronavirus

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: