धक्कादायक! 'तबलिगी'च्या लोकांकडून रुम बाहेरच शौच

वृत्तसंस्था
Tuesday, 7 April 2020

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत लोक

- 'नरेला'ची जबाबदारी लष्कराकडे 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, यातील काही लोकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास व्हावा, या हेतूने क्वारंटाईन रुमसमोरच शौच केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तबलिगी जमातच्या लोकांकडून आत्तापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार समोर येत आहे. यापूर्वीही काही प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता रुम बाहेरच शौच केल्याचा आरोप सध्या केला जात आहे. त्यामुळे या आरोपावरून दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाईन सेंटरने एक तक्रार दाखल केली आहे. यात तबलिगी जमातच्या दोन जणांची नावे आहेत. त्याच्यावर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेल्या रूमसमोरच शौच केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Ground Report: Nizamuddin Tablighi Jamaat

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत लोक

ही घटना 4 एप्रिलची असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. ज्या दोन जणांविरोधात तक्रार करण्यात आली, ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. हे दोघेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, यामुळे सेंटरमधील इतर लोकांनाही धोका आहे, असेही या तक्रारीत म्हणण्यात आले आहे. 

कर्मचाऱ्यांकडून माहिती

4 एप्रिलला रूम क्रमांक 212 बाहेर शौच करण्यात आली. या रूममध्ये राहणाऱ्या मोहम्मद फहद (25) आणि जहीर (18) यांची नावेही या संबंधित एफआयआरमध्ये आहेत. हे दोघेही बाराबंकी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांवरच शौच केल्याचा आरोप आहे, हा प्रकार सॅनिटायझेशनच्या वेळी कर्मचारी गेले असता तेव्हा समोर आला. 

Tablighi Jamaat

'नरेला'ची जबाबदारी लष्कराकडे 

नरेला आयसोलेशन कॅम्पची जबाबदारी आता भारतीय लष्करावर सोपवण्यात आली आहे. लष्कराच्या डॉक्टरांची मदत मागवण्यात आली, असे हे देशातील पहिलेच आयसोलेशन कॅम्प आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Against Two Tablighi Jamaat People After Latrine In Front of Room