Coronavirus : ...तेव्हाच विमानसेवा पुन्हा सुरु होईल : केंद्रिय हवाई वाहतूकमंत्री

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आल्याची आणि या व्हायरसमुळे देशाला आणि देशातील नागरिकांना कोणताही धोका नाही याची खात्री झाल्याशिवाय विमानसेवा पुन्हा सुरू होणार नाही, असे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे. ४ मे नंतर म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरही विमानसेवा सुरू करण्याबाबत केंद्राने अद्याप कुठलाही निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आल्याची आणि या व्हायरसमुळे देशाला आणि देशातील नागरिकांना कोणताही धोका नाही याची खात्री झाल्याशिवाय विमानसेवा पुन्हा सुरू होणार नाही, असे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे. ४ मे नंतर म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरही विमानसेवा सुरू करण्याबाबत केंद्राने अद्याप कुठलाही निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, एअर इंडियासह काही विमान कंपन्यांनी निवडक मार्गावरचे ४ मे पासूनचे बुकिंग सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वी, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केंद्राने ३ मे नंतर रेल्वे व विमान सेवा सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नसून त्याबाबत इतरांनी पूर्वानुमान करू नये, असे स्पष्ट केले. हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विमानसेवा ४ मे पासून सुरू करणार असल्याचे जाहीर केलेले नाही. याबाबतचा निर्णय सरकार घेणार आहे, त्यासाठी कुणीही ठोकताळे बांधू नये, असे म्हटले होते.

टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन

सरकारने रेल्वे व विमान सेवा सुरू करण्याबाबत काही कालमर्यादा ठरवली आहे का, या प्रश्नावर जावडेकर यांनी टाळेबंदी एक दिवस उठणार आहे पण कुठल्या दिवशी हे अजून ठरलेले नाही. त्याबाबत लोकांनी चर्चा करणे योग्य नाही. आम्ही रोज परिस्थितीचा अभ्यास करीत आहोत. त्यातून नवीन काहीतरी गोष्टी पुढे येत असल्याचे सांगितले होते. काही विमान कंपन्यांनी स्वत:हून ४ मे पासूनचे बुकिंग सुरू केले होते. त्या विमान कंपन्यांनाही बूकिंग न स्वीकारण्याचे आदेश देण्यात आल्याचे पूरी यांनी म्हटले आहे. तसेच विमानसेवा सुरू करण्याआधी विमान कंपन्यांना त्याबाबत पूर्वकल्पना दिली जाईल असेही पूरी यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flight restrictions to be lifted when COVID-19 is controlled says Hardeep Singh Puri