लॉकडाऊनं घेतला जीव; सलग 3 दिवस चालल्यानं चिमुरडीचा मृत्यू

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

बिजापूर जिल्ह्यातील अडेड गावाची चिमुरडी ही काही महिन्यांपूर्वी आपल्या मित्र आणि नातेवाईंकासमवेत तेलंगणातील चिली येथे शेतीकामासाठी गेली.

बिजापूर (छत्तीसगड) : लॉकडाउनमुळे बस, रेल्वे बंद असल्याने ती बारा वर्षाची चिमुरडी नातेवाईंकसमवेत घराकडे पायीच निघाली. तेलंगण ते छत्तीसगड असा प्रवास करत असताना त्यांनी शंभर किलोमीटर अंतरही कापले. त्यांनी चालताना थोडीही विश्रांती घेतली नाही. यात ती चिमुरडीही सारखी पळत असायची. पण शेवटी तिच्या शरिरातील पाणी कमी झाले. प्रचंड थकव्यामुळे तिच्या पायातील त्राणगेला आणि प्राणही. घराकडे जात असतानाचा तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जामालो मडकम असे त्या बारा वर्षाच्या मुलीचे नाव आहे. तिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. बिजापूर जिल्ह्यातील अडेड गावाची चिमुरडी ही काही महिन्यांपूर्वी आपल्या मित्र आणि नातेवाईंकासमवेत तेलंगणातील चिली येथे शेतीकामासाठी गेली. अकरा जणांची मजुरांची टोळी ही छत्तीसगडहून तेलंगणाला गेली. मात्र देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाउन झाले आणि कामेही ठप्प पडली. गावाकडे येण्याचे मार्गही बंद झाले. त्यामुळे १५ एप्रिल रोजी सर्वांनी गावाकडे पायी जाण्याचे ठरविले. सर्व राज्याच्या सीमा बंद असल्याने आणि वाहतूक नसल्याने ते सलग तीन दिवस चालले. या गटात जामालो देखील होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या गटातील मोठ्या लोकांसमवेत ती देखील न थकता चालली. त्यांनी शंभर किलोमीटरपर्यंतचे अंतर कापले होते. परंतु, तिच्या शरिरातील पाणी कमी झाल्याने आणि प्रचंड थकवा आल्याने तिचा मृत्यू झाला, असे डॉ. पुजारी यांनी सांगितले. तिची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली आणि अहवालही निगेटिव्ह आला. यादरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या घटनेबद्धल शोक व्यक्त केला असून, मृत जमालोच्या कुटुंबीयास एक लाखाची मदत दिली आहे. याशिवाय अन्य चार लाख रुपये देखील तातडीची मदत म्हणून देण्यात येईल, असे बघेल यांनी ट्‌विटवर सांगितले आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl dies after walking 3 days lockdown chhattisgarh