गुडन्यूज : भारतात हे राज्य झालं कोरोनामुक्त!

टीम ई-सकाळ
Sunday, 19 April 2020

संबंधित रूग्‍णाला इतर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांप्रमाणेच आता पुढील १४ दिवस डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात सतर्कता म्‍हणून ठेवण्‍यात येणार आहे.

पणजी Coronavirus : गोव्यात सात कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांची नोंद झाली होती. यातील सहा रुग्‍ण काही दिवसांपूर्वीच बरे झाले आहेत. उरलेला सातवा रुग्‍णही आज कोरोनामुक्‍त झाला असून, आता राज्‍यात एकही कोरोनाग्रस्‍त रूग्‍ण नसल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्र्यांचे ट्विट
संबंधित रूग्‍णाला इतर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांप्रमाणेच आता पुढील १४ दिवस डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात सतर्कता म्‍हणून ठेवण्‍यात येणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्‍णांवर इएसआय रूग्‍णालय, मडगाव येथे उपचार करणाऱ्या डॉ. एडवीन गोम्‍स आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे आरोग्यमंत्री राणे यांनी अभिनंदन केले आहे. रात्रंदिवस झटणाऱ्या डॉक्‍टरांच्‍या कष्‍टामुळेच हे शक्‍य झाले, असे आरोग्यमंत्र्यांनी ट्‍विट म्‍हटले आहे. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनीही डॉक्‍टर आणि आरोग्‍य खात्‍याचे अभिनंदन केले असून, आपण सर्व मिळून येथून पुढेही कोरोनाचा प्रवेश राज्‍यात न होण्‍यासाठी प्रयत्‍नरत राहू, असा संदेश दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: goa first state become coronavirus free