Coronavirus : सुंदर पिचाईंची भारताला ०५ कोटींची मदत

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

गुगलचे प्रमुख सुंदर  पिचाई यांनी भारताला कोरोनाशी लढा देण्यासाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ही मदत त्यांनी गिव्ह इंडिया या स्वयंसेवी संस्थेला दिली असून गिव्ह इंडियाने ट्विट संदेशात म्हटले आहे, की गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी जी मदत दिली त्यासाठी आम्ही आभारी आहोत.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने विळखा घातला असतानाच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असून त्यामुळे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. अशात गुगलचे प्रमुख सुंदर  पिचाई यांनी भारताला कोरोनाशी लढा देण्यासाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ही मदत त्यांनी गिव्ह इंडिया या स्वयंसेवी संस्थेला दिली असून गिव्ह इंडियाने ट्विट संदेशात म्हटले आहे, की गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी जी मदत दिली त्यासाठी आम्ही आभारी आहोत.

याआधीही गुगलने जगात लाखो लोकांना संसर्गाच्या विळख्यात ओढणाऱ्या करोनाविरोधात उपायांसाठी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत दिली होती. त्यात दोनशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक स्वयंसेवी संस्थात करण्यात आली होती. गुगलने अ‍ॅपलसमवेत भागीदारीत कोरोना संसर्गित व्यक्तींचे संपर्क शोधण्यासाठी उपयोजनाची निर्मिती केली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, याआधी भारत सरकारला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी टाटा ट्रस्ट व टाटा समूह यांनी करोनाचा सामना करण्यासाठी १५०० कोटींची मदत दिली होती. तर विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी ११२५ कोटी रुपये दिले होते. इतर कंपन्यांनीही मदत दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google CEO Sundar Pichai donates ₹5 crore to Give India

Tags
टॉपिकस
Topic Tags: