सरकारने नियम शिथिल करून दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली, पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 26 April 2020

लॉकडाउनमुळे होणारी लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकारने नियम शिथिल करून दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मोठ्या बाजारपेठा आणि मॉलचे कुलूप कायम राहणार असले तरीसुद्धा ग्रामीण भागांतील किरकोळ आणि स्वतंत्र दुकाने सुरू राहणार असल्याने ग्राहकांना दिलासा. रेडझोनमधील दुकानांना मात्र कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही.

मोठ्या बाजारपेठा, मद्य दुकानांना कुलूपच; हॉटस्पॉट क्षेत्रात सवलत नाही
नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे होणारी लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकारने नियम शिथिल करून दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मोठ्या बाजारपेठा आणि मॉलचे कुलूप कायम राहणार असले तरीसुद्धा ग्रामीण भागांतील किरकोळ आणि स्वतंत्र दुकाने सुरू राहणार असल्याने ग्राहकांना दिलासा. रेडझोनमधील दुकानांना मात्र कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्राच्या आदेशात स्पष्टता हवी
​किरकोळ व्यापार क्षेत्र सुरू करण्यास केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीचे दि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय) स्वागत करत सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. सरकारच्या ताज्या सरर्क्युलरचे सखोल विश्‍लेषण होणे गरजेचे असून यामध्ये अधिक स्पष्टपणा आल्याने त्याची अमलबजावणी करणे सोपे जाईल, असे या संघटनेने म्हटले आहे. यातील व्यापारी संकुलातील दुकानेसारख्या  संकल्पना सहजपणे लोकांच्या लक्षात येत नाही, त्याबाबत अधिक स्पष्टता येणे गरजेचे आहे.

सोशल डिस्टन्सिंगशी कसल्याही प्रकारची तडजोड न करता किरकोळ व्यापार सहजपणे सुरू व्हावा म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने किरकोळ व्यापारासाठी आवश्‍यक सर्व प्रकारचे मार्ग जे त्यांना सुरक्षित वाटतात ते खुले करावेत. यामध्ये सुसूत्रता आल्याने स्थानिक यंत्रणेला अधिक कठोरपणे त्याची अमलबजावणी करता येईल. देशातील मॉल्सदेखील खुले केले जावेत कारण त्यांच्याकडून व्यावसायिक नियमांबरोबरच सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य उपायांचे काटेकोरपणे पालन केले जाते असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी सांगितले.

बंधने -

  • परवानगी मिळालेल्या दुकानांतही निम्मेच कर्मचारी असावेत
  • मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे दुकानांवर बंधनकारक
  • ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तुंच्याच विक्रीची परवानगी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government relaxed the rules and allowed shops to open

Tags
टॉपिकस
Topic Tags: