Coronavirus : अर्थव्यवस्था अडचणीत, सरकार घेणार तब्बल एवढ्या कोटींचे कर्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 1 एप्रिल 2020

कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. अशात भारतातही कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने देशातील उत्पादन क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुढील सहा महिन्यात 4.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची शक्यता आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. अशात भारतातही कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने देशातील उत्पादन क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुढील सहा महिन्यात 4.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची शक्यता आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही माहिती आर्थिक व्यवहारविषयक बाबींचे सचिव आतानु चक्रवर्ती यांनी दिली हे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात बाजारामधून 7.8 लाख कोटी रुपये उधार घेण्यात येतील असा अंदाज व्यक्त केला होता. याचा अर्थ या रकमेतील 60 टक्के रक्कम पहिल्या सहा महिन्यात घेण्यात येईल. केंद्र सरकार आपली वित्तीय तूट भरून काढण्यासाठी बाजारातून पैसे उभारत असते. त्यासाठी बॉण्ड आणि ट्रेझरी बिल देण्यात येते.

कौतुकास्पद ! मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हरला दिली सुट्टी; स्वत:च चालवत आहेत गाडी

2020-21 या आर्थिक वर्षात सरकारची वित्तीय तूट 7.96 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हा आकडा देशाच्या  जीडीपीच्या 3.5 टक्के एवढा आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे सुमारे 120 अब्ज डॉलर (9 लाख कोटी रुपयांचे) नुकसान होण्याची शक्यता आहे, असा अंदाज एका वृत्तामधून वर्तवण्यात आला आहे. हे नुकसान देशाच्या एकूण जीडीपीच्या 4 टक्के आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt to borrow Rs 4.88 lakh cr in first half of FY21