Coronavirus : कोणतीही ट्रॅव्हल्स् हिस्ट्री नसतानाही टेस्ट पॉजिटिव्ह

वृत्तसंस्था
Tuesday, 7 April 2020

कोणाच्या संपर्कात असल्याचे अद्याप अस्पष्ट 

- काही दिवसांपासून घरीच

अहमदाबाद : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांची ट्रॅव्हल्स् हिस्ट्री असल्याचे अनेक प्रकरणात समोर आले आहे. पण अहमदाबादमधील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यावसायिकाची कोणतीही ट्रॅव्हल्स् हिस्ट्री नाही आणि ते गेल्या काही दिवसांपासून घरीच होते. तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, (जीवनावश्यक सेवा सोडून) सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेक गरजू व्यक्तींची गैरसोय होत आहे. त्यांच्या जेवणाचा प्रश्न मोठा आहे. या गरजूंसाठी अहमदाबादमधील मणिनगर येथे राहणाऱ्या या व्यावसायिकाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना जेवणाची पॅकेट आणि पाण्याची सोय केली होती. मात्र, हे साहित्य लोकांना देण्यासाठी त्यांनी स्वत: सहभाग घेतला नव्हता. तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

Coronavirus

कोणाच्या संपर्कात असल्याचे अद्याप अस्पष्ट 

संबंधित व्यावसायिक लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मोफत जेवण देत होते. लॉकडाऊनदरम्यान लोकांना जेवण तयार करण्याची जबाबदारी या व्यावसायिकाने एका स्वयंपाकीला दिली होती. हे जेवण लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही काही लोकांकडे सोपविले होते. तरीही हे व्यावसायिक कोणाच्या संपर्कात आले, याचा अंदाज येत नाही आहे, अशी माहिती दक्षिण वार्डचे उप-आरोग्य अधिकारी तेजस शहा यांनी दिली. 

काही दिवसांपासून घरीच

हे व्यावसायिक बरेच दिवस घरातच होते. याशिवाय त्यांची कोणती ट्रॅव्हल्स हिस्ट्री सुद्धा नाही. मात्र, आता त्यांचा कोरोना पॉजिटिव्ह रिपोर्ट आला असल्यामुळे आरोग्य संस्था त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat Businessman Helping Those Hit by Lockdown his Coronavirus Tests Positive