धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर दोन मंत्र्यांची भेट घेऊन निघालेल्या काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्या आमदाराचा कोरोनाचा रिपोर्ट येण्याच्या काही तास आधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर दोन मंत्र्यांची भेट घेऊन निघालेल्या काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्या आमदाराचा कोरोनाचा रिपोर्ट येण्याच्या काही तास आधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांना काही दिवसांपासून ताप होता. चाचणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते. पण तपासणीचा अहवाल येण्याआधीच ते बाहेर फिरत होते. सध्या त्यांना उपचारासाठी गांधीनगरमधील एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

Coronavirus : कोणतीही स्पेशल रेल्वे सोडणार नाही; रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत नियमांचं योग्य पालन करण्यात आल्याचं दिसत आहे. सर्वांनी मास्क घातले होते तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत एकमेकांमध्ये अंतर ठेवून बसले होते. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीत इतर काही मंत्रीही उपस्थित होते. गुजरातमध्ये आतापर्यंत करोनाचे ६१७ रुग्ण सापडले असून ५५ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat Congress MLA Imran Khedawala who met Vijay Rupani tests positive for coronavirus