देशातील सर्वात मोठे कोविड केअर केंद्र गुजरातेत 

पीटीआय
Wednesday, 15 April 2020

कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने कंबर कसली असून कोविडसाठीचे देशातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अहमदाबाद पालिकेने उभारले आहे. 

अहमदाबाद - कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने कंबर कसली असून कोविडसाठीचे देशातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अहमदाबाद पालिकेने उभारले आहे. या रुग्णालयात दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेऊ शकतील.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुजरात विद्यापीठाच्या हॉस्टेलच्या कॉम्प्लेक्समध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये वाचनालय, योगा केंद्र आणि घरगुती खेळासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. हे देशातील सर्वात मोठे कोविंडसाठीचे आरोग्य केंद्र असल्याची माहिती अहमदाबाद पालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी दिली. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र किट देण्यात येईल, त्यात साबण, ब्रश आणि बादलीचाही समावेश असेल. या रुग्णालयातील डॉक्टर हे दिवसातून दोनदा रुग्णांची तपासणी करतील. या डॉक्टर कर्मचाऱ्यांना देखील अद्ययावत सर्व सुविधा पुरविण्यात येतील. प्रत्यक्ष डॉक्टरांची देखील चौदा दिवसांनी तपासणी करण्यात येईल.

हेही नक्‍की वाचा : कामगारांसाठी मोठा निर्णय ! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये 

गुजरातमध्ये सहाशेपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून यातील ३४६ रुग्ण हे एकट्या अहमदाबाद शहरातील आहेत असे नेहरा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या आरोग्य केंद्रातील रुग्णासाठीचे खाद्यपदार्थ हे बाहेरच तयार करण्यात येतील. कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे रुग्णवाहिका देखील तयार असेल असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat largest Covid-19 Care Centres in the country