Coronavirus : धक्कादायक ! कोरोनापासून बचाव करण्यासाठी देवीसमोर कापली जीभ

पीटीआय
Monday, 20 April 2020

कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका तरुणाने स्वतःची जीभच देवीसमोर कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामगार असणारा हा तरुण मूळचा मध्य प्रदेशातील आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याने तो गुजरातमध्ये अडकला आहे. घरी जाण्यास मिळत नसल्याने त्याने मंदिरात देवीसमोर जीभ कापली. काहीजण त्याने देवीला दान करण्यासाठी जीभ कापली असल्याचे सांगत आहेत.

अहमदाबाद - कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका तरुणाने स्वतःची जीभच देवीसमोर कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामगार असणारा हा तरुण मूळचा मध्य प्रदेशातील आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याने तो गुजरातमध्ये अडकला आहे. घरी जाण्यास मिळत नसल्याने त्याने मंदिरात देवीसमोर जीभ कापली. काहीजण त्याने देवीला दान करण्यासाठी जीभ कापली असल्याचे सांगत आहेत.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विवेक शर्मा असं तरुणाचं नाव आहे. त्याचे २४ वर्ष वय असून तो शिल्पकार म्हणून काम करतो. शनिवारी विवेक शर्मा मंदिरात बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याच्या हात कापलेली जीभ होती. आम्ही त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ज्या मंदिरामध्ये हा प्रकार घडला त्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे. तर विवेक शर्मा तेथून १४ किमी अंतरावर असणाऱ्या एका मंदिरात काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन जाहीर झाल्यापासून विवेक शर्मा प्रचंड अस्वस्थ होता. त्याला आपल्या कुटुंबीयांची आठवण येत होती. त्यामुळे घऱी जाण्यासाठी तो उत्सुक होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homesick migrant cuts off tongue at temple to eradicate coronavirus