दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेस शंभरहून अधिकांची गर्दी

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

दहशतवादी सोपोर येथे ठार

- प्रशासनाकडून कारवाईस सुरुवात

श्रीनगर :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यावर (अत्यावश्यक सेवा वगळून) पूर्णपणे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे कुठंही एकत्र जमता येत नाही. मात्र, काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी १०० पेक्षा जास्त लोक जमले होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे अनेकांना घराबाहेर जाता येत नाही. बहुतांश लोकं इतर ठिकाणी अडकले आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये तर आपल्या आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता येत नसल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मात्र, काश्मीरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे एका दहशतवाद्याच्या अंत्यविधीसाठी काही लोकांनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत एकत्र जमले होते. यावेळी १०० पेक्षा अधिक जणांनी या अंत्यविधीला हजेरी लावली होती. 

 Funeral

दहशतवादी सोपोर येथे ठार

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर सज्जाद अहमद दार याला जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे ठार करण्यात आले होते. हा दहशतवादी येथील स्थानिक असल्याची माहिती मिळत आहे. दार याच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला १०० पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. 

फारूख अब्दुल्ला यांच्या बंधूंचेही निधन

जम्मू आणि काश्मीरमधील नेते फारुख अब्दुल्ला यांचे बंधू मोहम्मद अली मट्टू यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यावेळी, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन आणि प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्या समर्थकांना घरीच राहण्याचे आवाहन केलं होते. नागरिकांनी आपल्या घराकडे न येता, स्वत:च्या घरी राहूनच त्यांच्या काकांप्रती श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. 

Terrorist group

प्रशासनाकडून कारवाईस सुरुवात

या अंत्यविधीला अनेकांची उपस्थिती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अंत्ययात्रेस सहभागी झालेल्या लोकांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सोपोरचे एसएसपी जावेद इक्बाल यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds attend funeral of Sopore militant FIR registered for violation of lockdown