Coronavirus : आता झटपट होणार चाचणी; अमेरिकेकडून खास मशिनची खरेदी

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी भारताने अमेरिकेतून 9 हजार जनुक मशीन आयात केल्या आहेत. या मशीनचा वापर रुग्णांचे नमुने घेण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे आता भारतात कोरोनाची चाचणी झटपट होणार आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत असातना भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी भारताने अमेरिकेतून 9 हजार जनुक मशीन आयात केल्या आहेत. या मशीनचा वापर रुग्णांचे नमुने घेण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे आता भारतात कोरोनाची चाचणी झटपट होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दोन दिवसांपूर्वी टीबी टेस्टमध्ये वापरल्या गेलेल्या या मशीनचा वापर करून कोव्हिड-19च्या तपासणीस मान्यता दिली होती. आता असे म्हटले जात आहे की भारताने अमेरिकन कंपनीकडून 1 लाख मशीन आयात करण्याचे ठरवले आहे. अमेरिकन कंपनीचा असा दावा आहे की, हे मशीन एकाच वेळी 4 संशयित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी होऊ शकते. या मशीनमध्ये वेगवान केली जाऊ शकते, यामुळे एका तासात त्याचे रिपोर्ट येतील.

Coronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल

आयसीएमआरने या तपासणीत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. भारतात टीबीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही मशीन्स वापरली जाते ज्यामुळे औषधाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ट्रुनाटटीएम बीटा सीओव्ही चाचणीस मान्यता देताना आयसीएमआरने म्हटले आहे की ही चाचणी आता कोरोना संक्रमित रूग्णांसाठीही वापरली जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR approves TB machines for Covid-19 testing

Tags
टॉपिकस
Topic Tags: