esakal | Coronavirus : पाक पंतप्रधान इम्रान खान यांना भारताचं जोरदार प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

भारतात जाणीवपूर्वक मुस्लिमांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता. या आरोपाला भारताकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानला आपले अंतर्गत विषय हाताळता येत नाहीत, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडून मुद्दामून असे आरोप केले जात असल्याचे भारताने म्हटले आहे.

Coronavirus : पाक पंतप्रधान इम्रान खान यांना भारताचं जोरदार प्रत्युत्तर

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - भारतात जाणीवपूर्वक मुस्लिमांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता. या आरोपाला भारताकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानला आपले अंतर्गत विषय हाताळता येत नाहीत, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडून मुद्दामून असे आरोप केले जात असल्याचे भारताने म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असाताना भारतात मात्र, जाणीवपूर्वक मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका इम्रान खान यांनी केली होती. तसे ट्विटही त्यांनी केले होते. परंतु भारताने त्यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला असून पाकिस्तानने आपले अंतर्गत विषय हाताळावेत असा सल्लाही दिला आहे. आपल्या देशातील अंतर्गत विषय हाताळता येत नाहीत म्हणून लोकांचे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी नेतृत्वाकडून अशी विचित्र विधाने केली जात असल्याचेही भारताकडून सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे उत्तर दिले आहे.

कोरोना व्हायरसच्या फसलेल्या धोरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार मुस्लिमांना जाणीपूर्वक, हिंसक पद्धतीने लक्ष्य करत आहे. जर्मनीत नाझींनी ज्यू बरोबर जे केले तेच भारतात सुरु आहे. ज्यामुळे हजारो लोक उपाशी राहत आहेत असे आरोप पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकांचा आवाज दडपला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या देशातील अल्पसंख्यांकांना भेडसावणाऱ्या चिंतांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला सुनावण्यात आले आहे.

loading image
go to top