Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला मोठा निर्णय!

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

आता रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशभरात फक्त 400 मेल एक्सप्रेस सुरु आहेत. त्यादेखील एकदा शेवटच्या स्थानकांवर पोहचल्यानंतर रेल्वे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. तसेच सर्व रेल्वे सेवा परत सुरु करण्यासंबंधीचा निर्णय देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतात आत्तापर्यंत 324 कोरोना रुग्ण सापडले असून, महाराष्ट्रात मागील चोवीस तासांत 11 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडा दोनवर गेला आहे.

देवरुखात कोरोनाशी दोन हात ; लोकं सातच्या आत घरात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Railways has cancelled all passenger trains till 31st March