Coronavirus : कोरोनाची भीती बेतली जीवावर; गळफास घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था
Thursday, 26 March 2020

होम क्वारंटाईन लिस्टमध्येही नाही नाव

- कोरोनाच्या भीतीतून आत्महत्या? 

उडुपी : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेकांनी धसका घेतला आहे. त्यानंतर आता या कोरोनाच्या भीतीपोटी एका ५७ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्याने सुसाईड नोटही लिहिली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसच्या बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे हे आता आव्हान बनत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार, देशभरातील सर्वच दुकानं बंद करण्यात आली. त्याचा फटका सर्वसामान्यांना होत आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता कर्नाटकातील एका ५७ वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या भीतीपोटी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक नोटही लिहिली होती. त्यामध्ये त्याने लिहिले, की मी कोरोनाबाधित रुग्ण आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. कुटुंबियांनीही कोरोनाची तपासणी करावी, असेही या व्यक्तीने लिहिले.

होम क्वारंटाईन लिस्टमध्येही नाही नाव

ज्या व्यक्तीना कोरोनाची लक्षणं आहेत अशा लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, ज्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितले होते, त्यातही या व्यक्तीचे नाव नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Image result for Hang

कोरोनाच्या भीतीतून आत्महत्या? 

संबंधित व्यक्तीचे नाव होम क्वारंटाईन लिस्टमध्ये नव्हते. तसेच त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली नाही. त्यामुळे फक्त कोरोनाच्या भीतीतून त्याने आत्महत्या केली असावी, अंदाज व्यक्त केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Man Kills Self Over Fears He Had Contracted Coronavirus