जाणून घ्या केंद्राचे कोरोना पॅकेज; कोणा कोणाला मिळणार मदत?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 26 मार्च 2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिष घेऊन याची घोषणा केलीय. देशात कोणीही उपाशी राहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत असून, पोटाची खळगी भरण्याच्या उद्देशाने शहरी भागात स्थलांतरीत झालेल्या मजुरांना तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे केंद्राने जाहीर केले आहे.

नवी दिल्ली Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा धोका असल्यामुळं लॉक डाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळं अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. ज्याचं हातावरचं पोट आहे. त्यांची आबळ होऊ लागली आहे. अनेकांची दोन वेळच्या खाण्याची अडचण झाली आहे. परिणामी केंद्र सरकारने याची दखल घेऊन, रिलीफ पॅकेज जाहीर केलंय. यात गरीब कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस, शेतकऱ्यांना दोन हजार रुपये, अशा घोषणांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिष घेऊन याची घोषणा केलीय. देशात कोणीही उपाशी राहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत असून, पोटाची खळगी भरण्याच्या उद्देशाने शहरी भागात स्थलांतरीत झालेल्या मजुरांना तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे केंद्राने जाहीर केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातील कोरोनाच्या घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

कसे आहे केंद्र सरकारचे कोरोना पॅकेज?

 • केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
 • वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
 • प्रधानमंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
 • अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत
 • 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
 • आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये लगेच देणार
 • रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा करणार
 • अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
 • रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरून 202 रुपयांपर्यंत वाढ, 5 कोटी नागरिकांना फायदा

जगभरातील कोरोनाच्या घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

कोणाला मिळणार मदत?

 • महिला ज्यांचं जनधन खातं आहे, त्यांच्या खात्यात ३ महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रुपये
 • मनरेगा माध्यमातून काम करणाऱ्यांची रोजंदारी 182 वरुन 202 रुपयांपर्यंत वाढवली
 • 130 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये भरणार, देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील
 • पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता. जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल
 • वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी यासारख्या योद्ध्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know about central government coronavirus package information marathi