Coronavirus : भारतात असा पसरला कोरोना व्हायरस; पाहा व्हिडिओ

टीम ई-सकाळ
बुधवार, 25 मार्च 2020

जगभरात 4,22,829 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. असे असताना चीन, इटलीसह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५३६ वर पोहोचली आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (मंगळवार) देशभरात लॉकडाऊन केले जाणार असल्याची घोषणा केली. तसेच हे लॉकडाऊन एकप्रकारचा कर्फ्यू आहे, असे सांगायला देखील पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला आहे. पण मोदींची ही घोषणा करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आहे. 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, अमेरिकेसह भारतात रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सरकारे उपाययोजना करत आहेत. 

जगभरात 4,22,829 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरात 4,22,829 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये जवळपास 18,907 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,09,102 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. 

...म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले असतानाच भारताने मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे. भारतात पुढील २१ दिवस लॉकडाऊन असेल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णांची वाढती संख्या आणि बहुतांश नागरिकांमध्ये कोरोनाबाबत नसलेले गांभीर्य हे त्यामागचे कारण असण्याची शक्यता आहे. 

१ मार्चला ३ रुग्णांची नोंद आणि आता...

एक मार्चला ३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. २४ मार्चला ही संख्या ४९७ होती. मात्र, सध्या नवी आकडेवारी मिळत असून, यामध्ये ५३६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about Lock Down in India in Coronavirus Issue