Coronavirus : आता आणखी एका राज्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

16 राज्यात कोरोनाची प्रकरणं

- ओडिशा, महाराष्ट्रातही आढळला कोरोनाचा रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधील कोलकात्यात एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. कोरोनाग्रस्त 18 वर्षांचा तरुण आहे. सध्या त्याच्यावर उपचार केले जात आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लडाख, जम्मू काश्‍मीर, केरळ येथे नव्याने प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात आत्तापर्यंत तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.  

Image result for Coronavirus esakal

कोलकात्यात आता पहिला रुग्ण आढळून आला. कोरोनाबाधित 18 वर्षीय तरुण लंडनमध्ये होता. त्यानंतर आता तो पुन्हा मायदेशी आला आहे. जेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ही व्यक्ती 15 मार्चला लंडनहून भारतात आली. या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्याच्या पालकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

16 राज्यात कोरोनाची प्रकरणं

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील एकूण 16 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

ओडिशा, महाराष्ट्रातही आढळला कोरोनाचा रुग्ण

ओडिशा, महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ओडिशात यापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यानंतर सरकारकडून प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. भुवनेश्‍वर व कटकमधील सर्व मॉल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पोलिस आयुक्तालयाने दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolkata reports 1st case of coronavirus as 18 years old UK return tests positive