Coronavirus : लॉकडाऊनचा असाही होतोय फायदा!

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

नमामी गंगा योजनेनेही पडला नाही फरक

गंगेच्या स्वच्छतेत होतीये सुधारणा

वाराणसी : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फैलाव रोखता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भारतात या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. नागरिकांचे जाण्या-येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचाच फायदा देशातील सर्वांत मोठी आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र गंगा नदीला झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या अनेक दशकात वाढत्या औद्योगिकिकरणामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच गंगा नदीही खूपच प्रदूषित झाली आहे. गंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, त्यास अपेक्षित यश मिळू शकले नाही. मात्र, सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाला जमले नाही ते कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने करून दाखवले आहे. 

River Ganga

नमामी गंगा योजनेनेही पडला नाही फरक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नमामी गंगा योजना सुरु केली. सरकारच्या या योजनेनेही काहीसा फरक पडला नाही. पण लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश कंपन्या आणि कारखाने बंद आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश भागातील हवा शुद्ध झाली आहे. तसेच प्रदूषणकारी कारखान्यांमुळे जलप्रदूषणाचा सामना करत असलेल्या गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम झाला आहे. 

The Ganges is Too Toxic to be Holy Anymore - Fair Observer

गंगेच्या स्वच्छतेत होतीये सुधारणा

गंगेच्या स्वच्छतेत 40 ते 50 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. गंगेत होणाऱ्या एकूण प्रदूषणामध्ये उद्योगांचा वाटा 10 टक्के आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने प्रदूषणात मोठी घट झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown significantly improves water quality of Ganga