esakal | Coronavirus : 'या' राज्यात ३ मे नाहीतर ७ मेपर्यंत असणार लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

आम्ही तेलंगणामध्ये ०७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. ०८ मे रोजी लॉकडाऊन संपेल. राज्यात परदेशातून परतलेले फक्त ६४ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिल्लीतून परतलेल्या निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या जमातींची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासत असल्याचे लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना के चंद्रशेखर राव यांच्या सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात ऑनलाइन फूड सर्व्हिस देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे फूड सर्व्हिस देणाऱ्या झोमॅटो, स्वीगी आणि पिझ्झा डिलिव्हरीसुद्धा पूर्ण बंद राहणार आहे.

Coronavirus : 'या' राज्यात ३ मे नाहीतर ७ मेपर्यंत असणार लॉकडाऊन

sakal_logo
By
पीटीआय

हैद्राबाद - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने ०३ मेपर्यंत देशात लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात तेलंगणा राज्य सरकारने ०७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्ही तेलंगणामध्ये ०७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. ०८ मे रोजी लॉकडाऊन संपेल. राज्यात परदेशातून परतलेले फक्त ६४ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिल्लीतून परतलेल्या निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या जमातींची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासत असल्याचे लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना के चंद्रशेखर राव यांच्या सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात ऑनलाइन फूड सर्व्हिस देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे फूड सर्व्हिस देणाऱ्या झोमॅटो, स्वीगी आणि पिझ्झा डिलिव्हरीसुद्धा पूर्ण बंद राहणार आहे. 

तेलंगणा सरकारने म्हटलं आहे की, ०५ मे रोजी कॅबिनेटमध्ये राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या विमानतळांवरून हवाई सेवा सुरु करू शकत नाही. तसंच स्वीगी, झोमॅटो आणि पिझ्झा डिलिव्हरीसाठीही परवानगी नाही. रमजानच्या काळातही कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. सर्वांना लॉकडाऊनचं पालन काटेकोरपणे करावं लागणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशात केंद्र सरकारने सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केलं होतं. त्यानंतर पुन्हा ०३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. तेलंगणा हे महाराष्ट्राच्या शेजराचं राज्य असून तेलंगणात लॉकडाऊन वाढवल्यानंतर महाराष्ट्रात अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.