Coronavirus : ‘कोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध दीर्घ लढाई लढायची - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 April 2020

मोदींची पंचसूत्री 
1) गरिबांचे पोट भरण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अविरत सेवा मोहीम राबवावी. 
2) आपल्याबरोबरच इतर ५ ते ७ जणांसाठी घरगुती मास्क तयार करून त्याचे वितरण करा. 
3) वैद्यकीय, बॅंक व टपाल कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद स्वाक्षरी मोहीम राबवा.
4) प्रत्येकाने किमान ४० जणांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून द्यावे. 
5) पंतप्रधान केअर्स निधीत योगदान देण्यासाठी किमान ४० लोकांना प्रोत्साहित करावे.

नवी दिल्ली - ‘कोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध दीर्घ लढाई लढायची आहे. हे मानवता वाचवण्यासाठी चाललेले युद्ध आहे आणि आपल्याला त्यात विजयी होऊनच यायचे आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्षाच्या ४०व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. १४ एप्रिलला लॉकडाउन कधी एकदाचा संपतोय व आपण गर्दीत कधी जातोय असे झालेल्या उतावीळ लोकांना पंतप्रधानांनी सुस्पष्ट संकेत दिले आहेत.  ‘‘ युद्धकाळांमध्ये आपल्या माता-भगिनींनी आपले दागिने दान केले होते. ही स्थिती युद्धापेक्षा वेगळी नाही. भाजप सदस्यांनी पीएमकेअर फंडात मदत पाठवावी आणि आणखी ४० जणांना पैसे देण्याचे आवाहन करावे,’’ अशीही विनंती मोदी यांनी यावेळी केली.

मोदींची पंचसूत्री 
1) गरिबांचे पोट भरण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अविरत सेवा मोहीम राबवावी. 
2) आपल्याबरोबरच इतर ५ ते ७ जणांसाठी घरगुती मास्क तयार करून त्याचे वितरण करा. 
3) वैद्यकीय, बॅंक व टपाल कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद स्वाक्षरी मोहीम राबवा.
4) प्रत्येकाने किमान ४० जणांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून द्यावे. 
5) पंतप्रधान केअर्स निधीत योगदान देण्यासाठी किमान ४० लोकांना प्रोत्साहित करावे.

एकवेळ अन्न त्याग करा - जे. पी. नड्डा
लॉकडाउनमुळे अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्याप्रति सहानुभूती दर्शविण्यासाठी एका वेळच्या जेवणाचा त्याग करून भाहपचा स्थापना दिन साजरा करा, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

भाजपच्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचे कार्यकर्त्यांनी पालन करून, गरजूंना मदत करावी. भारताला कोव्हीड-१९ मुक्त करण्याचा निर्धार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A long battle against Corona world mate narendra modi