Coronavirus : भारतातील विषाणूची तीव्रता कमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

चीनमध्ये संसर्गाचा दुसरा टप्पा? 
बीजिंग - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना आज चीनमध्यहे नव्याने सुमारे दीड हजार रुग्ण आढळून आले असून विशेष म्हणजे त्यांच्यात कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणं नाहीत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या दुसरा टप्पा सुरू झाल्याची शक्यता चीनने व्यक्त केली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने यासंदर्भात माहिती देत कोणत्याही प्रकारची विषाणू नसलेल्या रुग्णांची संख्या जाहीर करणार असल्याचे सांगितले.  चीनने सोमवारी नव्याने सापडलेल्या १,५४१ रुग्णांना देखरेखीखाली ठेवले असून त्यात परदेशातील २०५ जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागाचे प्रमुख चँग जाईल म्हणाले की, अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या आणि स्थितीची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. दरम्यान, चीनमध्ये नव्याने ३५ रुग्ण आढळून आले असून त्यात एका स्थानिकाचा समावेश आहे.

नवी दिल्ली - अमेरिका, इटली आणि स्पेन या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची तीव्रता-क्षमता (स्ट्रेन) लक्षणीयरित्या कमी असल्याचे भारतीय शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. जनुकीय पद्धतीनुसार सखोल पृथःकरण करण्यात आले. त्यात वुहानमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूशी साधर्म्य दिसून आले. हा विषाणू तेवढा धोकादायक नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस’ (टेरी) संस्थाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रुप लाल यांच्या नेतृत्वाखालील १६ शास्त्रज्ञांच्या पथकाने हा अभ्यास केला.  इटली, स्पेन, अमेरिका, चीन आणि नेपाळ येथे झालेल्या अभ्यासातून संकलित करण्यात आलेली माहिती तुलनेसाठी वापरण्यात आली.लाल यांनी सांगितले की, SARS-CoV-2 (COVID19) हा विषाणू आपले स्वरूप बदलतो आहे.  

या अभ्यास गटातील महत्त्वाचे सदस्य विपीन गुप्ता यांनी सांगितले की, युरोपमध्ये या विषाणूने वेगाने आपल्या स्वरूपात बदल केले आणि त्यानंतर अमेरिकेत त्यात आणखी बदल होऊन स्वरूप धोकादायक बनले. भारतामधील विषाणू कमी क्षमतेचा का असावा?, या प्रश्नावर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही या घडीला ठोस निष्कर्ष काढू शकत नाही, पण अमेरिकेच्या तुलनेत संसर्गाची तीव्रता कमी आहे हे म्हणू शकतो. 

या अभ्यासात भारतीय शास्त्रज्ञांना अमेरिकेतील विषाणूच्या सहा वेगवेगळ्या नमुन्यांची जनुकीय रचना आढळून आली. त्यात आगळे अमिनो आम्ल मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lowering the severity of the virus in India