Coronavirus : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महिंद्रा सरसावले; करणार 'या' गोष्टींची निर्मिती

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

व्हेंटिलेटर्सनंतर आता त्यांची महिंद्रा ही कंपनी सॅनिटायझरच्या उत्पादनात उतरली आहे. महिंद्रा कंपनीच्या एका टीमनं सॅनिटायझरच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर यासंबंधी उत्पादनाचा एक परवाना मिळवला आहे. यानंतर कंपनीच्या ब्रँडेड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता आनंद महिंद्रा यांना भाग घेतला असून व्हेंटिलेटर्सनंतर आता त्यांची महिंद्रा ही कंपनी सॅनिटायझरच्या उत्पादनात उतरली आहे. महिंद्रा कंपनीच्या एका टीमनं सॅनिटायझरच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर यासंबंधी उत्पादनाचा एक परवाना मिळवला आहे. यानंतर कंपनीच्या ब्रँडेड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त कंपनी फेस शिल्डचंही उत्पादन करत आहे. याचा वापर वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोनाचं संक्रमण झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात मास्क आणि सॅनिटाझरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील अनेक ठिकाणी सॅनिटायझरची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचंही दिसून येत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी महिंद्रा कंपनी पुढे सरसावली असून त्यांनी सॅनिटायझर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला कंपनी ५०० फेस शिल्डचं उत्पादन करणार आहे. त्यानंतर गरजेनुसार याचं उत्पादन वाढवण्यात येईल. दरम्यान, देशात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत रोज यात नव्या रूग्णांची भर पडत आहे.

महाराष्ट्राचा आकडा २हजार पार; कोठे वाढले किती रुग्ण?

एकीकडे जगभरातील वैज्ञानिक कोरोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी औषधांचं संशोधन करत आहेत. तर दुसरीकडे याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापरही वाढत आहे. गेल्या महिन्यात महिंद्रा यांनी कमी किंमतीत व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याची सरासरी किंमत ७ हजार ५०० रूपये असल्याचंही सांगण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahindra expands face shield hand sanitizer production