Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी चक्क शेळ्यांना मास्क

वृत्तसंस्था
Friday, 10 April 2020

कोरोना विषाणूंमुळे सध्या सर्वच जण हवालदिल झाले असून नुकतेच अमेरिकेतील एका वाघाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्तसमोर आल्यानंतर आंध्रप्रदेशमधील कालूर मंडल येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेळ्यांनाच मास्क घातल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

हैदराबाद - कोरोना विषाणूंमुळे सध्या सर्वच जण हवालदिल झाले असून नुकतेच अमेरिकेतील एका वाघाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्तसमोर आल्यानंतर आंध्रप्रदेशमधील कालूर मंडल येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेळ्यांनाच मास्क घातल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेंकटेश्वर राव असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे २० शेळ्या आहेत. राव यांच्या शेळ्यांचा मास्क घातलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, की मला जेव्हा कळले की प्राण्यांनासुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते, त्यावेळी माझ्या मनात शेळ्यांना मास्क घालण्याचा विचार आला. कारण माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन केवळ या २० शेळ्याच आहेत. त्यामुळे मी स्वतः त्यांच्यासाठी मास्क बनवण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्यावेळी मी शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन जातो, त्यावेळी त्यांना मास्क घालतो असेही राव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mask the goats to prevent corona