Coronavirus : काळजी घ्या; नाहीतर मेपर्यंत 13 लाख लोकांना कोरोना होण्याची शक्यता

वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन असल्याची घोषणा केली. मात्र, असे असले तरी शास्त्रज्ञांनी मात्र कोरोना व्हायरस संबधित मोठी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाऊ शकते.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन असल्याची घोषणा केली. मात्र, असे असले तरी शास्त्रज्ञांनी मात्र कोरोना व्हायरस संबधित मोठी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाऊ शकते. अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका भारतीय शास्त्रज्ञांनी COVID-19च्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यांतून तिसऱ्या टप्प्यात गेल्या नंतर याचा परिणाम भारताच्या आरोग्या सेवा प्रणाली होईल. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखणे कठिण होईल", असे म्हटले आहे. त्यांच्या मते, कोरोनाबाबात शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कमी टेस्ट केल्या आहेत. ही संख्या इतर देशांपेक्षा भारतात कमी आहे. 18 मार्चपर्यंत भारतात केवळ 11 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळं ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, भारतातील लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे सोयीसुविधा कमी आहेत. भारतात सध्या 1000 लोकांमागे बेडचे प्रमाण केवळ 0.7 आहे. तर, फ्रान्समध्ये 6.5, दक्षिण कोरिया 11.5, चीन 4.2, इटली 2.9 आणि अमेरिका 2.8. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती बिकट झाल्यास चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: may coronavirus patients will rise up to 13 lakh syas scientists