Coronavirus : केंद्रिय गृहमंत्रालयाकडून दुसऱ्या लॉकडाउनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर; मास्क बंधनकारक

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

केंद्रिय गृहमंत्रालयाकडून लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये तोंडावर मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे हे आता बंधनकारक आहे.

नवी दिल्ली : केंद्रिय गृहमंत्रालयाकडून लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये तोंडावर मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे हे आता बंधनकारक आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा. दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी, अशा काही गोष्टीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

जिम, स्पोर्ट कॉम्पेलक्स, चित्रपटगृह, स्विमिंगपूल, हॉटेल, शॉपिंग मॉल हे ०३ मे पर्यंत पूर्णपणे बंद राहतील. यासोबतच सर्व प्रकारची प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. आरोग्य खात्याने घालून दिलेल्या नियमावलींच्या आधारे भाजी मार्केट, मंडी या स्पेशल परवान्याच्या आधारे चालू राहतील असे सांगण्यात आले आहे.

Coronavirus : कोणतीही स्पेशल रेल्वे सोडणार नाही; रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

दरम्यान, देशात आणि महाराष्ट्रात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी ३५० कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. दिवसभरात करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १० हजारच्या पुढे गेली असून आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. काल (ता. १४) एकाच दिवसात १४०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHA issues guidelines for lockdown 2.0, makes wearing of face mask compulsory

Tags
टॉपिकस
Topic Tags: