esakal | Coronavirus : मोदी साधणार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद; 'या' पक्षाने केला विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Modi calls all party video meet TMC says it'll skip it

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून ती बुधवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. कोरोना महासाथीच्या आपत्तीनंतर सुमारे दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच विरोधकांना विश्वासात घेतले जात आहे.

Coronavirus : मोदी साधणार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद; 'या' पक्षाने केला विरोध

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून ती बुधवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. कोरोना महासाथीच्या आपत्तीनंतर सुमारे दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच विरोधकांना विश्वासात घेतले जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधानांनी प्रतिकात्मक प्रयोग थांबवून कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक बिकट परिस्थितीबाबत लोकांशी संवाद साधला पाहिजे. १ लाख १५ हजार कोटींचा मदतनिधी तुटपुंजा असून आर्थिक मुद्यावर मोदींनी बोलले पाहिजे, असे विरोधकांचे म्हणणे होते. विरोधी पक्षांकडून सातत्याने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली जात होती; पण करोनामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वित्त विधेयकांच्या मंजुरीनंतर १६ मार्च रोजी संस्थगित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी विरोधकांशी संवाद साधलेला नाही.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२५; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

संसदेत पाचपेक्षा जास्त खासदार असलेल्या राजकीय पक्षांच्या दोन्ही सभागृहांतील गटनेत्यांना या बैठकीला बोलावले जाणार आहे. कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपायांची माहिती या नेत्यांना दिली जाईल. या बैठकीला संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे गटनेता थावरचंद गेहलोत हे मंत्री उपस्थित असतील. या बैठकीसंदर्भातील पत्र संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाठवले आहे.

तबलिगी जमातने पाकिस्तानची उडविली झोप; ४१ हजार जणांना शोधण्याचे लक्ष

तत्पूर्वी, सर्वपक्षीय बैठकीला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलेले असताना तृणमूनल काँग्रेस पक्ष या सर्वपक्षीय बैठकीत सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभा नेते सुदीप बंडोपाध्याय आणि राज्यसभा नेते डेरेक ओब्रायन यांनी प्रल्हाद जोशी यांना ते व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये सामील होणार नसल्याचे सांगितले आहे.

loading image