coronavirus : नव्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 18 April 2020

नवे रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये ४० टक्के एवढी घट झाली आहे.कोरोनातून बरे झालेले रुग्ण ८०टक्के असून मरण पावणाऱ्यांचे प्रमाण २०टक्के एवढे आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाची बाधा झालेले नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असून सध्या ते १.२ टक्के एवढे आहे. नवे रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये ४० टक्के एवढी घट झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनातून बरे झालेले रुग्ण ८० टक्के असून मरण पावणाऱ्यांचे प्रमाण २० टक्के एवढे आहे. अमेरिका तसेच प्रगत देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती अजूनही चांगली आहे असा दावा करण्यात आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार देशात आजमितीस स्थिती नियंत्रणात असली तरी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा धोकादायक फैलाव पुन्हा होऊ शकतो. सर्व राज्यांमधील सद्यःस्थितीची पाहणी केल्यानंतर केंद्राने नोंदवलेल्या एका निरीक्षणानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोरोनाचा देशातील उद्रेक कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे. त्यातही लॉकडाउन आधी जाहीर केलेले राजस्थान, पंजाब, बिहार या राज्यांत कोरोनाचा उतरता कल आधी पाहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे कोरोनाला यशस्वीरीत्या थोपवण्यात यश आलेल्या केरळमध्येही हा संसर्ग लवकर थांबू शकतो अशी अशी शक्यता आहे. 

देशातील बरे झालेले रूग्ण 
ता. १५ - ११. ४१ % 
ता. १६ - १२.२ % 
ता. १७ - १३.६% 

भारत आणि अन्य  देशांतील मृतांचे प्रमाण 
भारत... ३.३ टक्के 
स्पेन.. ९.८ % 
इटली.. १२.१ % 
इंग्लंड.. १२ % 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New corona patients rate down to 40 per cent