Coronavirus : होम आयसोलेशनसाठी नवी मार्गदर्शकतत्वे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

कोरोनाच्या संसर्गाची अत्यल्प प्रमाणातील लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीच्या टप्प्यात असलेले (प्री-सिम्प्टोमॅटीक) रुग्ण त्यांच्या घरातच एकांतवासात (होम आयसोलेशन) राहू शकता. फक्त त्यासाठी ठरवून दिलेल्या सुविधा घरात उपलब्ध असणे गरजेचे असून, त्यांचा घरातील इतर सदस्यांशी संपर्क येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (ता. २८) म्हटले आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाची अत्यल्प प्रमाणातील लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीच्या टप्प्यात असलेले (प्री-सिम्प्टोमॅटीक) रुग्ण त्यांच्या घरातच एकांतवासात (होम आयसोलेशन) राहू शकता. फक्त त्यासाठी ठरवून दिलेल्या सुविधा घरात उपलब्ध असणे गरजेचे असून, त्यांचा घरातील इतर सदस्यांशी संपर्क येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (ता. २८) म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाची अल्प स्वरुपातील लक्षणे आढळलेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरातच एकांतवासात राहण्याबाबतची मार्गदर्शकतत्वे आयोग्य मंत्रालयाने जारी केली आहेत. 

अशा आहेत सूचना -

  • अल्प लक्षणे किंवा लक्षणे दिसत नसल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेले हवे
  • जिल्हा दक्षता अधिकाऱ्याला रुग्णाने नियमीत तब्येतीची माहिती द्यावी
  • रुग्णाची काळजी घेणाऱ्याला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे प्रतिबंधात्मक औषध देण्यात यावे
  • सर्व संशयित आणि बाधीत रुग्णांना सध्या रुग्णालयांमधील एकांतवास कक्षांमध्ये ठेवण्यात येत आहे 
  • ज्यांच्या घरात एकांतवासाची सुविधा करणे शक्य आहे फक्त अशाच अल्प लक्षणे किंवा प्री-सिम्प्टोमॅटीक रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय दिला जातो
  • काळजी घेणारी व्यक्ती २४ तास उपलब्ध हवी
  • काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्णालय यांच्यात संवादाची सुविधा कायम उपलब्ध हवी
  • आरोग्य सेतू अॅप मोबाइलमध्ये डाउनलोडकरून सदैव अॅक्टीव मोडवर ठेवावे 
  • श्वास घेण्यात अडचण, छातीत सातत्याने दुखणे, मानसिक गोंधळ, ओठ/चेहऱ्याचा रंग निळसर होणे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याने सूचना केल्यास तातडीने उपचार उपलब्ध करून देणे 
  • प्रयोगशाळेतील चाचणीनंतर संसर्ग झालेला नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यानंतर एकांतवासाचा कालावधी संपविण्यास परवानगी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New guidelines for home isolation