टोलवसुली पुन्हा होणार सुरु; केंद्र सरकारची मान्यता

वृत्तसंस्था
Saturday, 18 April 2020

केंद्र सरकारने 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमधून काही सेवांना सूट देण्यात आली आहे. अनेक महामार्गांवरून वाहनांची ये-जा होणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गावर 20 एप्रिलपासून टोलवसुली करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर ही मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचदरम्यान मोदी सरकारने एक नियमावली तयार केली असून, काही बाबींना यामधून सूट दिली आहे. केंद्र सरकारने 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे. टोलवसुलीच्या माध्यमातून महसूलात मोठी वाढ होत असते. अर्थसंकल्पीय पाठबळासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास आर्थिक मजबूती देतो. 

Highways

आंतरराज्य व इतर राज्यातील सर्व ट्रक व इतर वस्तू किंवा वाहनांसाठी गृह मंत्रालयाने दिलेली शिथिलता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आवश्यक ती कारवाई करावी. असे गृह मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NHAI To Resume Toll Collection On National Highways From April 20