Coronavirus : ‘राष्ट्रीय ग्रीड’वर परिणाम नाही - नितीन राऊत

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

हे बंद
घरातील लाईट आणि अन्य दिवे

हे सुरू
पथदिवे, टी.व्ही, संगणक, फ्रीज, एअर कंडिशनर, अन्य उपकरणे

पुरेसा इंधनसाठा
२३ मार्च ते ३ एप्रिल या काळामध्ये रेल्वेने २.५ लाख डबे भरून कोळसा आणि १७ हजार ७४२ डबे भरून पेट्रोलियम पदार्थ पाठविण्यात आले आहेत. देशातील सर्व ऊर्जा प्रकल्पांकडे पुरेसा इंधन साठा आहे असे आज रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन केले असून त्यामुळे याचा राष्ट्रीय ग्रीडवर काहीही परिणाम होणार नाही असे आज ऊर्जा मंत्रालयांकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीद ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे बंद करत घराची दारे आणि बाल्कन्यांमध्ये पणत्या आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संपूर्ण राज्यातील विद्युत प्रवाह खंडित होण्याची भीती व्यक्त केली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरातील दिवे बंद करणे ऐच्छिक असून हे आवाहन रस्त्यांवर सार्वजनिक दिवे आणि घरगुती उपकरणांना लागू होत नाही. केवळ दिवेच बंद करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे असे ऊर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

ऊर्जामंत्र्यांच्या सूचना
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता.५) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांकरिता  संपूर्ण देशातील जनतेला घरातील विजेचे दिवे बंद करून  मेणबत्त्या, पणत्या व मोबाईल टॉर्च लावण्यास जनतेला सांगितले आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था व ग्रीडचा बिघाड (Failure) टाळत राज्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांना पत्राद्वारे दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no effect on national grid nitin raut