esakal | आता एकावेळी एकालाच मेसेज पाठवता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp

सोशल मीडियावर कोरोना संसर्गासंदर्भात पसवरण्यात येणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी व्हॉटसॲपने महत्त्वाचा निर्णय घेत मेसेज फॉरवर्डिंगवर मर्यादा आणली आहे.

नव्या नियमानुसार व्हॉटसअप यूजर आता कोणताही मेसेज एकावेळी एकालाच पाठवू शकणार आहे. यापूर्वी एकाचवेळी एक मेसेज पाच जणांना पाठवणे शक्य होते. हे फीचर अपडेट केल्यानंतरच सक्रिय होणार आहे. 

आता एकावेळी एकालाच मेसेज पाठवता येणार

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - सोशल मीडियावर कोरोना संसर्गासंदर्भात पसवरण्यात येणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी व्हॉटसॲपने महत्त्वाचा निर्णय घेत मेसेज फॉरवर्डिंगवर मर्यादा आणली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या नियमानुसार व्हॉटसअप यूजर आता कोणताही मेसेज एकावेळी एकालाच पाठवू शकणार आहे. यापूर्वी एकाचवेळी एक मेसेज पाच जणांना पाठवणे शक्य होते. हे फीचर अपडेट केल्यानंतरच सक्रिय होणार आहे. 

जगात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर त्यासंदर्भात सोशल मीडियावर हजारो बनावट बातम्या व्हायरल होत आहेत. ट्विटर, गूगल आणि फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरून बनावट बातम्यांना ऊत आला आहे. त्यामुळे फेसबुकच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या व्हॉटसॲपवरील मेसेज फॉरवर्डिंगवर निर्बंध आणले आहेत. नव्या बदलानुसार आता कोणत्याही मेसेजला एकावेळी एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करता येणार आहे. यापूर्वी देखील फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन फेक न्यूजला लगाम घालण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेतला होता. गूगलने देखील खोट्या बातम्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ट्विटरवर देखील खोट्या बातम्या रोखण्यासाठी फिल्टरचा वापर करत आहे. व्हॉटसअॅपच्या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. व्हॉटसअॅप ॲप अपडेट केल्यानंतर नवीन निर्बंध कार्यान्वित होतील.

दोन अब्ज यूजर
संपूर्ण जगात व्हॉटसअॅपवर दोन अब्जाहून अधिक यूजर सक्रिय आहेत. त्यात भारताच्या ४० कोटी यूजरचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे व्हॉटसअॅप फॉरवर्ड मेसेजचे प्रमाण ४० टक्क्याने वाढले आहे. गेल्यावर्षी पाच मेसेजची मर्यादा आणल्यानंतर फॉरवर्ड मेसेजमध्ये २५ टक्के घसरण झाल्याचा दावा कंपनीने केला होता.

loading image
go to top