esakal | Coronavirus : देशभरातील कोरोनाची स्थिती काय? जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : देशभरातील कोरोनाची स्थिती काय? जाणून घ्या!

गुजरातमध्येही वाढतोय आकडा

- महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

- राजस्थानात ६४ नवी प्रकरणं समोर

Coronavirus : देशभरातील कोरोनाची स्थिती काय? जाणून घ्या!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, भारत, युरोप, फान्स, इटलीसह आता जगभरात थैमान घालत आहे. भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 20,080 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ केली आहे. आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. 'वर्ल्ड मीटर्स'नुसार, देशभरात सध्या 20,080 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 645 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 3,975 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 5,218 हून अधिक रुग्णांची नोंद झाली.

राजस्थानात ६४ नवी प्रकरणं समोर

राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसची नवी 64 प्रकरणं समोर आली आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1,799 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 26 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पंतप्रधान घेणार कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. यावेळी ते देशात कोरोनाची काय स्थिती आहे, यावर चर्चा करणार आहेत. 

मुंबईत वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती देण्यात येत आहे. 

गुजरातमध्येही वाढतोय आकडा

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुजरातमध्येही वाढत आहे. सध्या गुजरातमध्ये 2,178 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिल्लीत  2,156 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राजस्थानमध्ये 1,659, मध्यप्रदेशात 1,552 रुग्णांची नोंद झाली आहे.