Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये; मृतांचा आकडा...

वृत्तसंस्था
Saturday, 11 April 2020

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

- ३५ ठिकाणं बनली हॉटस्पॉट

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका, भारत आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 7,600 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. त्यामुळे आता इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. सध्या 7,600 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 249 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 774 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Coronavirus : काळजी घ्या! मास्कवर कोरोना ...

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सध्या वाढ होत आहे. तर काही रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Coronavirus

३५ ठिकाणं बनली हॉटस्पॉट

राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, संस्कृतिक राजधानी वाराणसी व पुणे आणि सर्वात स्वच्छ शहराचा मान सातत्याने मिळवणाऱ्या इंदोरसह देशाच्या आठ राज्यांमधील किमान ३५ ठिकाणं कोरोना महासाथीचा हॉटस्पॉट बनली आहेत.  परिणामी या शहरांमधील एका मागोमाग एक भाग हे पूर्णतः सील करण्याचे धोरण यंत्रणेला अमलात आणावे लागत आहे. सील कराव्या लागणाऱ्या भागांमध्ये वाढ होणार नाही, याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in India