भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 90 हजार पार... 

वृत्तसंस्था
Sunday, 17 May 2020

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

- जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर

नवी दिल्ली :  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका, भारत आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. भारतातही याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 90,927 वर पोहचली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग हा एक चिंतेचा विषय बनत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन 4.0 ची घोषणा करण्यात आली आहे. नव्या नियमावलीसह 18 मेपासून लॉकडाऊन लागू असणार आहे. वर्ल्डोमीटर्सनुसार, सध्या भारतातील 90,927 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 2,872 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आत्तापर्यंत 34,224 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशातील मोठ्या शहरांची परिस्थिती चिंताजनक असून, एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई या शहरातील आहेत. या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 46 हजार आहे. 

Latest Western (Paschim) Maharashtra News Update, Breaking ...

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर

जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 47,21,828 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर यामध्ये 3,13,260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 18,12,136 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांमध्ये भारत 11 वा 

जगात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत 47 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भारताचा जगात 11 वा क्रमांक लागतो. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्राझिल, फ्रान्स, इटली, स्पेन आणि पेरु या देशानंतर भारताचा क्रमांक येतो. 

Big Breaking : बारामती झाली कोरोनामुक्त ...

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 15 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सध्या वाढ होत आहे. तर काही रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in The India Now 90927 Patients