esakal | Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...

दिल्लीतील कार्यक्रमामुळे वाढतोय बाधितांचा आकडा

- सूचनांचे पालन करा

Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. भारतातही याचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. त्यामुळे ही एक चिंतेची बाब बनत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या संपूर्ण जगात कोरोनाबधितांची संख्या 9,35,870 वर गेली आहे. तर आतापर्यंत 47,241 हजारांहून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. भारतात आत्तापर्यंत 1,998 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. तर 148 जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ते सध्या कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, 58 कोरोनाबाधित रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

दिल्लीतील कार्यक्रमामुळे वाढतोय बाधितांचा आकडा

राजधानी दिल्लीत 'तबलिगी जमात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शेकडो लोक उपस्थित होते. त्यांच्यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातूनच आता देशभरात याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सूचनांचे पालन करा

कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, हे प्रमुख आहे. अशा सूचनांचे पालन केल्यास काही प्रमाणात याचा प्रसार होण्यावर लगाम लावता येऊ शकतो. 

loading image
go to top