Coronavirus : देशावर अद्यापही कोरोनाचे सावट; अशी आहे परिस्थिती!

वृत्तसंस्था
Thursday, 16 April 2020

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

- मुंबईत वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस अमेरिका, भारत, युरोप, फान्स, इटलीसह आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. भारतातही याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 12,370 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यानुसार आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. त्यामुळे इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या 12,370 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 422 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 1,508 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 2500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून, 200 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Coronavirus

मुंबईत वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती देण्यात येत आहे. 

काही भाग पूर्ण सील

हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमधील एका मागोमाग एक भाग हे पूर्णतः सील करण्याचे धोरण यंत्रणेला अमलात आणावे लागत आहे. सील कराव्या लागणाऱ्या भागांमध्ये वाढ होणार नाही, याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

Coronavirus

दिल्लीत 1578 जणांना कोरोनाची लागण

राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत 1578 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबाबतची माहिती सरकारकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increasing in India