Coronavirus : देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटतेय; पण...

वृत्तसंस्था
Saturday, 18 April 2020

कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 1.2 टक्के

- महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, भारत, युरोप, फान्स, इटलीसह आता जगभरात थैमान घालत आहे. भारतातही याचे प्रमाण वाढत असले तरी दुसरीकडे मात्र नव्या रुग्णांचे प्रमाण सध्या घटत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 14,352 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यानुसार आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. त्यामुळे इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. देशभरात सध्या 14,352 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 486 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 2,041 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Coronavirus

कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 1.2 टक्के

देशात कोरोनाची बाधा झालेले नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असून, सध्या ते 1.2 टक्के एवढे आहे. नवे रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये 40 टक्के एवढी घट झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनातून बरे झालेले रुग्ण 80 टक्के असून, मरण पावणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के एवढे आहे. अमेरिका तसेच प्रगत देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती अजूनही चांगली आहे, असा दावा करण्यात आला. 

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 3300 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून, 201 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Coronavirus

मुंबईत वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती देण्यात येत आहे. कालपर्यंत 77 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2120 वर गेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of New Coronavirus Patient Decreases in India Now 14352 Coronavirus Infected Patients