Lock Down : केंद्र सरकारच्या घोषणेपूर्वीच इथं झाली लॉकडाऊनमध्ये वाढ

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

लॉकडाऊन वाढवणारे पहिले राज्य 

इतर राज्यांकडूनही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

भुवनेश्वर : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखता यावा, यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. भारतातही सध्या लॉकडाऊन लागू आहे. याची मुदत २१ दिवसांनी म्हणजे येत्या १४ एप्रिलला संपत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या घोषणेपूर्वीच लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार देशातील सर्वच व्यवहार ठप्प आहेत. पण या लॉकडाऊनमुळे घराबाहेर जाता येत नसल्याने लॉकडाऊनच्या निर्णयाचे काय होणार याचीच चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. कोरोनामुळे देशातील विविध राज्यातील परिस्थिती गंभीर बनत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी काही राज्यांकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यावर सध्या विचार सुरु आहे. असे असतानाच ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

३० एप्रिलपर्यंत राहणार लॉकडाऊन

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. ही मुदत संपत असतानाच ओडिशा सरकारने लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण एप्रिल महिना लॉकडाऊनमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

India fights Covid-19

लॉकडाऊन वाढवणारे पहिले राज्य 

सध्या देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. परंतु ही परिस्थिती पाहता ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य आहे. 

Lock Down

इतर राज्यांकडूनही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि राजस्थान सरकारने यापूर्वीच लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Odisha first Indian state to extend Covid 19 lockdown till April 30