Coronavirus : कोरोनाविरोधात ‘ऑपरेशन शिल्ड’

वृत्तसंस्था
Saturday, 11 April 2020

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सरकारी खर्चात कपात करावी लागत आहे. त्यामुळे येत्या काळात केवळ  वेतन आणि कोरोना संसर्गावर उपचारासाठी खर्च केला जाणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. दिल्लीत कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता २१ ठिकाणी ‘ऑपरेशन शिल्ड’ राबविले जाणार आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सरकारी खर्चात कपात करावी लागत आहे. त्यामुळे येत्या काळात केवळ  वेतन आणि कोरोना संसर्गावर उपचारासाठी खर्च केला जाणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. दिल्लीत कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता २१ ठिकाणी ‘ऑपरेशन शिल्ड’ राबविले जाणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर हल्ले करणारे किंवा असभ्य वर्तन करणाऱ्या नागरिकांची गय केली जाणार नाही, अशीही तंबी केजरीवाल यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच सफदरजंग रुग्णालयात महिला आरोग्य कर्मचाऱ्यांशी नागरिकांनी आक्षेपार्ह वर्तन केले होते. त्यामुळे केजरीवाल यांनी कडक कारवाईचा इशारा दिला. त्यांनी काम बंद केले तर आपला जीव धोक्यात येईल, असेही ते म्हणाले.

सील - या स्थितीत सील केलेल्या परिसरात कोणीही प्रवेश करु शकणार नाही आणि कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही. सर्व प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध.

होम क्वारंटाइन - लोकांना घरातच राहण्यास सांगणे. त्यांना कुटुंबातील अन्य सदस्यांपासून वेगळे राहण्यास सांगणे आणि बाहेर फिरण्यास मज्जाव करणे. इतर कुटुंबीयांनीही वेगवेगळे राहणे.

आयसोलेशन - आयसोलेशनच्या काळात रुग्णांचा कोणाशीही संपर्क येणार नाही याची काळजी घेणे. त्याचे फोनकॉल्स ट्रेस करुन त्याला भेटणाऱ्यांना आयसोलेट करण्याची कार्यवाही करणार. 

इन्सेशिअल - गरजू आणि सर्वसामान्यांना आवश्‍यक असणाऱ्या वस्तू पोचवणे. यात भाजीपाला, धान्य, अन्न आणि वैद्यकीय सुविधांचा समावेश राहिल. 

लोकल सॅनेटायजेशने - बाधित व्यक्तीच्या घराची आणि परिसरात फवारणी करणे. बाधित परिसरातून संसर्ग पसरणार नाही यासाठी लोकल सॅनेटायजेशन केले जाणार आहे. 

डोअर टू डोअर - आरोग्य सेवेतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेणार आहे. संशय आल्यास रुग्णालयास संपर्क करुन त्याच्यावरील उपचाराची सोय केली जाणार आहे. संसर्ग थांबविण्यासाठी संशयित व्यक्तीचा शोध घेणे या माध्यमातून शक्य होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operation Shield against Corona